आश्रम शाळेच्या संचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप
By Admin
आश्रम शाळेच्या संचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिक्षक शाळेत कामावर हजर नसताना देखील संस्था प्रशासन व समाज कल्याणचे अधिकारी यांनी संगनमताने शासनाची फसवणुक करुन सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देश्य ग्रामीण विकास प्रति ष्ठान संस्थे च्या सद्गुरु रोहिदासजी अनुसूचित जाती केंद्रीय प्राथमिक आश्रम शाळा खंडगाव (तालुका पाथर्डी) यांनी दोन वर्षाचे वेतन लाटल्याचा आरोप श्रीकांत कचरे यांनी केला आहे.याप्रकरणी चौकशी करुन संस्थाचालक व दोषी अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सद्गुरु रोहिदासजी अनुसूचित जाती केंद्रीय प्राथमिक आश्रम शाळा खंडगाव (तालुका पाथर्डी) या शाळेवर असलेले कर्मचारी अनिल कांबळे २०१८ मध्ये मयत झालेले असताना त्यांच्या नावावर संस्थेने २०२२ अखेर वेतन दिल्याचे दाखवून अनुदान मिळणे कामी प्रस्ताव पाठवाल्याने नुकताच गुन्हा दाखल झाल्यानंतर,पुन्हा हे फसवणुकीचे नवीन प्रकरण समोर आले आहे.याप्रकरणात देखील संस्थाचालक व संंबंधित समाज कल्याणचे अधिकारी अडच णीत येण्याची चिन्हे आहेत.श्रीकांत कचरे हे सदर शाळेवर सन २०१४ ते २०१९ अखेर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते.सदर संस्थेने केंद्र शासनाचे अनुदान येऊनही संस्थेने वेतन,मानधन न दिल्याने त्यांनी तत्कालीन संस्था पक अध्यक्ष तसेच संचालक मंडळाला वेतनाची मागणी केली होती.तत्कालीन संस्था पक अध्यक्षांनी कचरे यांना आश्रम शाळेवर येण्यास मज्जाव केल्याने व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद मध्ये याचिका दाखल केली.यानंतर न्यायालयाच्या आदेशाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाला.आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तपास पूर्ण करून न्यायालय
अहमदनगर येथे तत्का लीन दोषी संचालक मंडळावर दोषारोपपत्र दाखल केले आहे.सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
संस्थापक अध्यक्षांनी आश्रम शाळेवर येण्यास मज्जाव केल्याने २०१९ नंतर कचरे खांडगाव आश्रम शाळेवर कार्यरत नसताना विद्यमान संचालक मंडळाने २०१९ ते आज अखेर केंद्र शासनाचे अनुदान मिळण्याकामी ऑनलाईन प्रस्ताव पाठविले.सन २०२०-२१ प्राथमिक प्रस्तावमध्ये व सन २०२१-२२ प्रस्तावमध्ये सदर संस्थेने वेतन व मानधन मिळवले असल्याचा आरोप कचरे यांनी केलेला आहे.हा प्रस्ताव पाठविताना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सदर आश्रम शाळेची १ ते १९ मुद्दे निहाय १६ मार्च २०२१ व २७ मार्च २०२२ रोजी तपासणी करून वर्षाच्या शेवटच्या ३१ मार्च रोजी ऑनलाईन प्रस्ताव खात्रीपूर्वक अॅप्रूवल करून पाठविला आहे.जन माहिती अधिकारी तथा आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्याकडून माहिती अधिकारातील प्राप्त माहितीत या प्रस्तावात सदर संस्थेने माझ्या नावाचा गैरवापर करत माझ्या नावे वेतन,मानधन दिल्याचे दाखविले असल्याचे कचरे यांचे म्हणने आहे.सदर प्रस्तावात २०१८-१९ व २०१९-२० या वर्षाचे ऑडिटमध्ये
कोरोना काळात शाळा बंद असताना विद्यार्थी खर्च,शिक्षक,कर्मचारी वेतन, मानधन खर्च झालेली दिल्याचे दाखवले आहे.नावाचा गैरवापर करुन केंद्र शासनाकडून वेतनापोटी अनुदान मिळवल्याप्रकरणी विद्यमान संचालक मंडळ,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसेच ऑडिटर अधिकारी यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी श्रीकांत कचरे यांनी केली आहे.