मोबाईल टाॕवरचे साहित्य चोरणारे दोन तरुण गजाआड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मोबाईल टॉवरच्या युनिटमधील डीआरयू कार्ड व केबलची चोरी करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगावातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह 7 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आला आहे.
अटकेतील आरोपी हे आयडिया टॉवर कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून नोकरी करत होते.
मन्मत जगन्नाथ पाटील (वय 29, रा. वडगाव, ता. चाकूर, जि. लातूर, हल्ली रा. खंडोबानगर, ता. शेवगाव) व रामकिसन हरिभाऊ तांदळे (वय 27, रा. गुंळज, ता. गेवराई, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दि. 23 जूनला नगर शिवारातील इंडस कंपनीच्या आयडिया मोबाईल टॉवरच्या युनिटमधील 6 हजार500 रूपये किंमतीच्या तीन अॅल्युमिनियमचे डीआरयू कार्डची चोरी झाली होती. याबाबत, कंपनीचे कर्मचारी गोविंद दत्तात्रय मचाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, शेवगाव येथे चोरीचे साहित्य विक्री करण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्याकडून मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने शेवगाव येथे सापळा लावला. लांडेवस्ती येथे चोरीचा माल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले.
पथकाने त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी नगर तालुक्यातील व पाथर्डी परिसरातील मोबाईल टॉवरचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब कुरुंद, विशाल दळवी, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, आकाश काळे व शिवाजी ढाकणे आदींच्या पथकाने केली. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.