महाराष्ट्र
वह्या, पुस्तकांचे गोडावून समाजकंटकाने दिले पेटवून
By Admin
वह्या, पुस्तकांचे गोडावून समाजकंटकाने दिले पेटवून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीरामपुरात समाजकंटकाने वह्या-पुस्तकांच्या दुकानाला आग लावून सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान केले.
श्रीरामपुरात समाजकंटकाने वह्या-पुस्तकांच्या दुकानाला आग लावून सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान केले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. श्रीरामपूर शहरात स्टेट बँक चौक, कुकरेजा कॉम्प्लेक्स येथील न्यू संतोष बुक स्टॉल हे दुकान एस. संतोष अग्रवाल व त्यांचे वडील संतोष गोपीकिसन अग्रवाल, भाऊ शुभम अग्रवाल असे चालवतात. दुकानातील माल ठेवण्यासाठी त्यांनी जुने तार ऑफिसजवळ ग्राऊंड फ्लोअरला फ्लॅट स्वरूपात गोडावून केले असून तेथे वह्या पुस्तके व स्टेशनरी साहित्य भरून ठेवलेले होते.
जून महिना जवळ आल्याने सुमारे 5 ते 6 लाखांचे शैक्षणिक साहित्य तेथे भरून ठेवलेले होते. कोणीतरी अज्ञात आरोपीने रात्रीच्या वेळी दरवाजाचे कुलूप तोडून व तेथे घुसून विजेच्या तारा तोडल्या व त्यानंतर आतील सामानाला आग लावून दिली. ही आग इतकी भडकली की आजूबाजूच्या लोकांनी रात्री निरोप दिल्याने यश अग्रवाल, वरूण अग्रवाल व अग्रवाल परिवार आणि त्यांचे मित्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लगेच तेथे अग्निशामक बंबही आला.
त्याने पाण्याचा अखंड मारा करून ही आग विझविली. मात्र, तोपर्यंत 5 ते 6 लाखांचे वह्या-पुस्तके व स्टेशनरी साहित्य जळून राख झाले. या घटनेने अग्रवाल परिवाराला धक्का बसला असून परिसरातीलच कोणीतरी संशयित व्यक्तीने दरवाजा तोडून ही आग लावली अशी तक्रार थेट श्रीरामपूर पोलिसात यश संतोष अग्रवाल या व्यापार्याने दिली. त्यावरून अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि कलम 448, 426 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यापार्याच्या गोदामाला आग लावणार्या आरोपीचा शोध पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस घेत आहेत.
Tags :
147
10