महाराष्ट्र
शिर्डी साईबाबांना दहा लाखाची तीन सोन्याचे कमळ फुले देणगी
By Admin
शिर्डी साईबाबांना दहा लाखाची तीन सोन्याचे कमळ फुले देणगी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
हैद्राबाद येथील रेड्डी साईभक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी 214. 45 ग्राम वजनाचे तब्बल 9 लाख 98 हजार 497 रुपये किंमतीचे तीन नग सोन्याचे कमळ फुले साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले असल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
शिर्डी: हैद्राबाद (Hydrabad Devotee)येथील रेड्डी साईभक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी 214. 45 ग्राम वजनाचे तब्बल 9 लाख 98 हजार 497 रुपये किंमतीचे तीन नग सोन्याचे कमळ फुले साईबाबा (Shirdi Saibaba Temple)संस्थानला देणगी स्वरुपात दिले असल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.हैद्राबाद येथील साईभक्त श्री.एम.राजेंद्र रेडडी या भाविकांने आपल्या इच्छेनुसार तीन नग सोन्याचे कमळाचे फुले आज साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले आहे. अतिशय सुंदर कारागीर केलेल्या या सोन्याच्या कमळ फुलांना रेड्डी या भाविकाने साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे सुपूर्त केली आहेत. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीच्या वेळी या तिन्ही कमळ फुलांना साईबाबांच्या अंगावरील वस्त्रावर लावण्यात आले होते. तसेच साईबाबांच्या मंदिरात नित्नेमाने होणाऱ्या आरतीच्यावेळी हे सोन्याचे कमळ फुले बाबांच्या अंगावरील वस्त्रावर लावण्यात येणार आहे.साईबाबांचे भक्त असलेल्या देश विदेशातील भाविकांनी गेल्या नऊ दहा वर्षा पासुन
साईबाबांची झोळीत कोटयावधींची आणि मंदीर सुवर्ण करण्याचा जनु ध्यासच घेतला आहे. साईबाबांना 110 किलोचे सोन्याचे सिहासन दान म्हणुन आल्यानंतर सोन्याच्या वस्तु दान करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. जसजसा सोन्याचा दर उच्चांकी पातळी गाठतोय तसेच भक्त सोन्याच्या वस्तु दान म्हणुन बाबांना देत आहेत. जणु या भक्तांना सोन्याच्या किमती पेक्षा बाबांची भक्तीच अधिक मौल्यवान आहे.
Tags :
351
10