शेवगाव- आव्हाणे खुर्दला भरदिवसा घरफोडी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील आव्हाणे खुर्द येथे भरदिवसा घरफोडी झाली असून, रोख रकमेसह मोठा ऐवज चोरीस गेला आहे. आव्हाणे खुर्द येथील भीमराज सीताराम आहेर हे आपल्या कुटुंबासह गावातील भरवस्तीमध्ये राहतात.बुधवारी, 3रोजी घरातील सर्वजण दुपारी शेतीकामासाठी शेतामध्ये गेले होते.
सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आले असता, घराचे कुलूप तुटलेले दिसले.
घरामध्ये सामान अस्ताव्यस्त पडून कपाटाचे लॉकरमधून सोन्याचे मनी, कानातील कर्णफुले असा मिळून 28 हजार _रुपयांचा ऐवज आणि रोख दहा हजार रुपये ऐवज चोरीस गेला आहे. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी शेतात गेल्यामुळे दिवसाच चोर्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेजारील अमरापूर येथेही असा प्रकार झाल्याचे समजते. भीमराज आहेर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार काळोखे हे करीत आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा तपास लावून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.