भारत सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष,माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन
नगर- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व माजी आमदार दौलतराव मल्हारी पवार (वय-८२) यांचे दुखत निधन झाले आहे.गेल्या काही दिवसापासून ते पोटाच्या विकाराने ञस्त होते.पुणे येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडवण्यात आलं होते.दरम्यान पुन्हा ञास जाणवू लागल्याने त्यांना तालुक्यातील श्रीरामपुर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.आज दुपारी ०१ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.माजी आमदार व भारत सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष दौलतराव पवार यांच्या मागे पत्नी ,चार मुले यांच्यासह सुना,नातवंडे असा मोठा परीवार आहे.
त्यांचे निधन झाल्याने परीसरात व शिक्षण,राजकीय ,सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.