ईगतपुरी तालुकास्तरीय फुटबाॕल क्रिडा स्पर्धा संपन्न
ईगतपुरी- प्रतिनिधी
इगतपुरी येथे दि. 17/8/23 गुरुवार रोजी इगतपुरी तालुकास्तरीय फुटबाॕल क्रिडा स्पर्धा 14 वर्ष आणि 17 वर्ष मुले आणि मुलीच्या स्पर्धा इगतपुरी तालुका क्रीडा संकुल इगतपुरी येथे संपन्न झाल्या
या स्पर्धेचे उदघाटन महिंद्रा आणि महिंद्रा चे फुटबॉल खेळाडू ,उत्तम कोच,फुटबॉल चे जाणकार पंच श्री शिवराज थापा यांचे शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांनी विध्यर्थी याना जिद्द खेळाडूवृत्ती ,रोज सराव, निष्ठा,या बाबत मार्गदर्शन केले या प्रसंगी ब्लॉसम इंग्लिश स्कूल चे क्रीडाशिक्षक श्री अनिल गोडसे, पोदार इंटरनॅशनल स्कूल चे अशोक चव्हाण,पंचवटी इंग्लिश स्कूल चे क्रीडाशिक्षक राजकुमार शर्मा,महात्मा गांधी हायस्कूल चे राहुल पंडित,रमेश उबाळे उपस्थित होते, तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागेश कासार, अभय थानक,सोनू गिरी, शुभम दुबे,यांनी सहकार्य केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तालुका स्पर्धा प्रमुख विजय सोनवणे यांनी प्रयत्न केले
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे -
14 वर्ष मुले आणि मुली
प्रथम- लिटल ब्लॉसम इगतपुरी
द्वितीय- पोदार स्कूल
17 वर्ष मुले आणि मुली
प्रथम - लिटल ब्लॉसम इगतपुरी
द्वितीय- पोदार इंटरनॅशनल स्कूल इगतपुरी