महाराष्ट्र
5899
10
केदारेश्वर , श्री गणेश सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुक प्रकिया सुरु;29 मार्च पर्यत ठराव
By Admin
केदारेश्वर , श्री गणेश सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुक प्रकिया सुरु;29 मार्च पर्यत ठराव
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्यात 14 बाजार समिती निवडणुकांपाठोपाठ श्री गणेश आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांसाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांनी दोन्ही कारखान्यांच्या सभासद असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविले असून, 29 मार्चपर्यंत हे ठराव देण्याची मुदत आहे. राहातातील श्रीगणेश, आणि राहुरीचा डॉ. तनपुरे हे दोन कारखाने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातील संचालक मंडळाच्या ताब्यात आहेत. तर केदारेश्वर कारखाना प्रताप ढाकणे यांच्याकडे आहे. दरम्यान, या तीनही कारखान्याच्या संचालक मंडळांची मुदत काही महिन्यांपूर्वीच संपलेली आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुका कधी लागणार, याकडे सभासदांसह विरोधकांचेही लक्ष लागले होते. अखेर प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी मिलिंद भालेराव यांनी या संदर्भात काढलेल्या पत्राद्वारे दोन कारखान्यांच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरू झाल्याचे समोर आले.
राहुरी कारखाना वगळता श्री गणेश आणि केदारेश्वर या दोन कारखान्यांच्या 2023-28 या कालावधीकरीता होणार्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये संस्थेच्यावतीने मतदान करण्यासाठी संस्था प्रतिनिधीचा ठराव 29 मार्चपर्यंत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. संबंधित संस्थांकडून येणार्या ठरावाची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट केले जाणार आहेत. दरम्यान, एप्रिलमध्ये सभासदांची मतदार यादी तयार होऊन, निवडणुकांचा कार्यक्रम लागणार असल्याचे सहकार (साखर) विभागाकडून सांगण्यात आले.
राहुरी कारखान्याचीही लवकरच रणधुमाळी !
डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याकडे जिल्हा बँकेचे 112 कोटींचे कर्ज आहे. या वसुलीपोटी बँकेने कारखान्याची मालमत्ता जप्त केलेली आहे. बँकेचा अधिकार हा फक्त मालमत्तेपुरता असून, आतापर्यंत संचालक मंडळच प्रशासन म्हणून काम करत होते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या निवडणुकीला अडचण नसल्याने, लवकरच राहुरी कारखान्याचाही कार्यक्रम लागणार असल्याचे सहकार (साखर) विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Tags :