सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात टेम्पोचा बर्निंग थरार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास टेम्पोला अचानक आग लागली.
आगीत आयशर टेम्पो जळून खाक झाला. या आयशर टेम्पो मध्ये प्लास्टिक भोत भरलेले असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले.
सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचरण करण्यात आले. पथकाने शर्तीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, आकाश देवकर, लक्ष्मण सोनकुसरे, जयेश बोरसे आदींचा पथकात समावेश आहे.
एमआयडीसी अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. टेम्पो (क्र. एमएच ४८ बीएम १६७६) - घोटीहून सिन्नरच्या दिशेने येत होता. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येतात त्याने रस्त्याच्या कडेला आयशर टेम्पो उभा केला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र टेम्पो संपूर्णपणे जळून खाक झाला.
ट्रकमध्ये प्लॅस्टिक असण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. आटोक्यात आणण्यासाठी लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, आकाश देवकर, लक्ष्मण सोनकुसरे, जयेश बोरसे आदींनी प्रयत्न केले. हा ट्रक (क्रमांक एम एच 48 बी एम 16 76( घोटीहून सिन्नरच्या दिशेने जात असल्याचे समजते. ट्रकच्या आगीने क्षणार्धात रुद्र रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झालेला होता.