कोरडगावला मिळाली पैठण येथील गंगामातेची स्वच्छता सेवा करण्याची संधी
पाथर्डी प्रतिनिधी:
शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची पुण्यभूमी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पैठण येथे ह. भ. प. राम महाराज झिंजूर्के (सद्गुरु श्रीजोग महाराज सेवा संस्थान आखेगाव)यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच गोदावरी मातेची स्वच्छता करण्यात आली.
गेल्या आठ नऊ महिन्यांपासून प्रत्येक शुद्ध एकादशीला हे स्वच्छता अभियान राबवण्यात येते. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील वेगवेगळ्या गावांचा यामध्ये समावेश असतो. कार्तिक शुद्ध एकादशीच्या निमित्ताने ही सेवा करण्याची संधी पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव आणि मुखेकरवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव या गावाला मिळाली. या गावातील सर्व ग्रामस्थ, शेवगाव- पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजळे, ह. भ. प. लक्ष्मण महाराज भालेकर, कोरडगावचे सरपंच रविंद्र उर्फ भोरूशेठ म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य त्रिंबक देशमुख, प्रताप देशमुख, नागनाथ वाळके, बबनभाऊ मुखेकर, जालिंदर मुखेकर, प्रल्हाद मुखेकर, नानासाहेब जाधव, गोविंद बारगळ, अशोक रावतळे, अशोक गोरे, विष्णुपंत शेळके, गणेश मुखेकर, अंकुश मुखेकर, कोरडगाव येथील वैष्णव आश्रमाचे भक्तगण महिला बचत गटाच्या सर्व सदस्या तसेच हिंगणगाव येथील महिलांनी यामध्ये सहभाग घेऊन गंगा मातेची स्वच्छता केली.