आल्हणवाडी येथे विज्ञान व साहित्य प्रदर्शन
पाथर्डी प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आल्हणवाडी येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान व साहित्य प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणविस्तार अधिकारी श्रीम.सुनिता पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख रामदास लांघी, माजी सरपंच राधाकिसन कर्डिले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदिनाथ गव्हाणे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.व्ही.एस.पंडित, शिक्षक नेते अर्जुन शिरसाट, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन जाधव, सुरेश पवार,अविनाश पालवे, न्यू इंग्लिश स्कूलचे श्रीआठरे, सत्रे, ढोबळे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात इयत्ता पहली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या संपुर्ण कार्यक्रमासाठी अरविंद चव्हाण व श्रीम. सविता देखणेंनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनिता पवार यांनी भूषविले तर सुत्रसंचालन अरविंद चव्हाण यांनी केले.
अरविंद चव्हाण यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना स्वप्न पहा. आपल्या स्वप्नांवर मनापासून प्रेम करा, तरच आपली स्वप्न प्रत्यक्षात साकारतील,असा संदेश दिला.