महाराष्ट्र
82667
10
गॅस सिलिंडरसाठी देखील करावी लागणार आधारची केवायसी
By Admin
गॅस सिलिंडरसाठी देखील करावी लागणार आधारची केवायसी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आता खोट्या
ओळखपत्रावर एलपीजी सिलिंडर मिळणे कठीण होणार आहे. कारण, ते आधारशी लिंक होणार आहे. तेल विपणन कंपन्या आता एलपीजी ग्राहकांच्या ओळखीसाठी आधार आधारित ई-केवायसी सुरू करत आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली.
ई-केवायसी साठी ग्राहकांना कुठेही जाण्याची गरज नाही. एलपीजी सिलिंडर घरपोच डिलिव्हरी केल्यावर डिलिव्हरी करणारी व्यक्ती अॅपद्वारे त्याची पडताळणी करावी लागणार आहे. मात्र, ग्राहक त्यांच्या वितरकांशी संपर्क साधून त्यांच्या सोयीनुसार है पूर्ण करू शकतात. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी किंवा सरकारने कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही.
इण्डेन
तेल विपणन कंपन्यांना आधार आधारित ई-केवायसी आवश्यक आहे. कारण, असे बरेच लोक आहेत जे निवासी नावाने एलपीजी खरेदी करतात; परंतु व्यावसायिक कारणांसाठी वापरतात. घरगुती एलपीजी सिलिंडर स्वस्तात मिळतात, तर व्यावसायिक सिलिंडर महाग असतात. उदाहरणार्थ, १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १६४६ रुपये, तर १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची
किंमत ८०३ रुपये आहे. आता ई-केवायसीच्या माध्यमातून सरकारला हे थांबवायचे आहे आणि सबसिडी योग्य लोकांपर्यंत जाणार आहे.
ई-केवायसी तीन प्रकारे करता येणार आहे. ग्राहकांना जवळच्या एलपीजी वितरकाच्या शोरूममध्ये जाऊन केवायसी करता येणार आहे. त्यानंतर जेव्हा दुसरा गॅस डिलिव्हरी करणारी व्यक्ती सिलिंडरची डिलिव्हरी करेल तेव्हा तो मोबाईल अॅपद्वारे
केवायसी करू शकणार आहे. तिसरे, तेल कंपन्यांच्या मोबाईल अॅप्सद्वारे ई-केवायसी सहज करता येणार आहे. भारत, इंडेन आणि एचपीसाठी अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर मोबाईल अॅपद्वारे देखील ई-केवायसी करता येणार आहे. आधार मोबाईलशी लिंक आहे आणि एलपीजी खाते सक्रिय असल्याची खात्री करून त्यानंतर एलपीजी प्रदात्याच्या साइटवर जाऊन येथे ई-केवायसी पर्याय निवडून आणि आवश्यक तपशील, जसे की एलपीजी ग्राहक क्रमांक आणि आधार क्रमांक भरावा लागणार आहे. मोबाईलवर आलेला ओटीपी भरून त्यानंतर हा डेटा तेल विपणन कंपन्यांद्वारे प्रमाणित केला जाईल आणि सत्यापन पूर्ण झाल्यानंतर एक पुष्टीकरण संदेश येईल.
Tags :

