घरात घुसून बिबट्याचा वृद्धावर हल्ला; आरडाओरडा होताच ठोकली धूम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील निंब्रळ येथील वाटी तिटमेवस्ती शिवारात शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्लाकरून निवृत्ती सयाजी उघडे या ८० वर्षीय वयोवृद्धास जखमी केले.
वृध्दाच्या उजव्या खांद्याजवळ दंडाला दोन दात लागून जखम झाली आहे. शुक्रवारी सकाळी उघडे कुटुंबीयांनी वनकर्मचारी गावकरी यांचे मदतीने अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
नेहमीप्रमाणे निवृत्ती हे घरातील उंबरठ्यावर झापले होते. घराला दरवाजा नाही. घरालगत शेळ्या बकऱ्या बांधलेल्या होत्या. त्या बंदिस्त होत्या. घरालगत ऊसाचे रान आहे. या शेतातून बिबट आला व थेट घरात घुसून पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. घरातील इतरांनी आरडाओरड केल्याने बिबट्या ऊसाच्या रानात पसार झाला.