महाराष्ट्र
77454
10
ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पाथर्डी तालुक्यात आरक्षण बचाव यात्रा
By Admin
ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पाथर्डी तालुक्यात आरक्षण बचाव यात्रा
पाथर्डी प्रतिनिधी:
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजनांचे नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २५ जुलै पासून राज्यात सुरु झालेली एस सी, एस टी ,ओ बी सी आरक्षण बचाव यात्रा बुधवार दि ३१ जुलै रोजी पाथर्डी तालुक्यात येत असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी दिली आहे.
प्रा. किसन चव्हाण यांनी दिलेल्या माहिती नुसार गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा व ओबीसी याच्यात आरक्षणवरून संघर्ष पेटलेला आहे, त्यामुळे गावागावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. गरीब मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिले गेले पाहिजे आणि ओबीसीच आरक्षणाचं ताट स्वतंत्र आणि मराठा समाजाचं ताट वेगळं ही भूमिका सुरुवातीपासूनच वंचित बहुजन आघाडीची राहिलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गावोगाव जातीय सलोखा राहावा व घटनात्मक आरक्षणाची संकल्पना अधिक स्पष्ट व्हावी, घटनात्मक आरक्षण वाचावे यासाठी एस सी, एस टी, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरु केलेली आहे.
ओबीसी चे आरक्षण वाचले पाहिजे. एस सी, एस टी विध्यार्थना शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ओबीसीच्या विद्यार्थांना सुद्धा एस सी, एस टी प्रमाणे शिष्यवृती जशीच्या तशी मिळाली पाहिजे, एस सी, एस टी, ओबीसीला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ओबीसी चे शंभर आमदार निवडून आणणे,,या उद्दिष्ठासह ही यात्रा निघालेली आहे.
ही यात्रा बुधवारी ३१ जुलै रोजी पाथर्डी तालुक्यात येत असून सकाळी दहा वाजता माणिकदौंडी, केळवंडी त्यानंतर भटक्याची पंढरी श्री क्षेत्र मढी,निवडूंगे, पाथर्डी शहर,खरवंडी आणि नंतर श्री क्षेत्र भगवानगड, मिडसांगवी मार्गे बीड जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. पाथर्डी तालुक्यात ठिकठिकाणी या यात्रेचे ओबीसी बांधवासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जोरदार स्वागत करणार आहेत, तरी या यात्रेत एस सी, एस टी, भटके विमुक्त, ओबीसी बांधवासह सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केले आहे.
Tags :

