महाराष्ट्र
21845
10
आमोद नलगे यांना माजी राष्ट्रपती डाॕ.जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
By Admin
आमोद नलगे यांना माजी राष्ट्रपती डाॕ.जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जळगांव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पबचत भवन येथे आदिलशाह फारूकी संस्थेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगांव येथील सामाजिक,शैक्षणिक कार्यकर्ते आमोद नलगे यांना नूकतेच डाॕ.जाकीर हुसैन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.आमोद नलगे यांनी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कार्य केले असून ते समाजासाठी अहोरात्र झटत असतात.समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी ते कायम तत्पर असतात.आपल्या समाज कार्यामूळे एक उत्तम समाज सेवक म्हणून त्यांची समाजात प्रतिमा निर्माण झाली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य करून शिक्षण क्षेत्रातील एक लढवैया नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जात.अनेक संघटनांवर ऊत्तम प्रकारे कार्य करून त्यांनी त्यांचा ठसा ऊमठवला आहे.
अतिशय परखड, सत्य वक्ता असणारे आमोद नलगे यांना लहान पणापासूनच सामाजिक व शैक्षणिक कार्याची आवड असल्या कारणाने अल्पावधीतच ते समाजप्रीय झाले आहेत.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार कैलास पाटील अध्यक्षस्थानी होते तर तर प्रमूख पाहूणे म्हणून उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख,जळगांव जिल्हा अप्पर कोषागार शकील देशपांडे,नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर,ङाॅ.राहूल मयूर,आदि राज्यभरातून मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराबाबत नलगे यांच सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष फारूक शहा नौमानी यांनी केले तर सूत्रसंचालन फारूक पटेल यांनी केले.पुरस्काराला ऊत्तर देतांना नलगे म्हटले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते परंतू त्यातून मिळणारा आनंद हा कायम स्वरूपी असतो.हा पुरस्कार म्हणजेवेळोवेळी समाजाचा विविध क्षेत्रात सन्मान करणार्या निस्वार्थी सामाजीक बांधिलकी जपणार्या धेयवेड्या समाजप्रीय व्यक्तींना पुढील कार्यासाठी भरभरून पाठीवर टाकलेली शाब्बासकीची थाप आहे.या पुरस्कारीने मी भाराऊन गेलो नाही तर आणखी सामाजिक ध्येयाने पेटून ऊठलो आहे.या पुरस्काराने माझी समाजाप्रती आणखी जबाबदारी वाढली आहे.
Tags :
21845
10





