महिलांसाठी खेळ_पैठणीचा "न्यु होम मिनिस्टर" या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन
पाथर्डी- प्रतिनिधी
आमच्या महिला भगिनी दिवसरात्र संसाराच्या कामात, मुलाबाळांच्या देखरेखीत नेहमीच व्यस्त असतात. माता - भगिनींना या सर्व व्यापातून बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मा.आमदार मोनिकाताई राजीव राजळे वतीने खास महिलांसाठी खेळ_पैठणीचा "न्यु होम मिनिस्टर" या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पाथर्डी शहरात सिने_अभिनेता क्रांतीनाना माळेगावकर व शेवगाव पाथर्डी च्या कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे,सह्याद्री माळेगावकर व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यू होम मिनिस्टर हा हास्य, गाणे, गप्पा, गोष्टींचा अतिशय रंगतदार कार्यक्रम संपन्न झाला. हजारो महिलांनी यास हजेरी लावून एक दिवस धमाल एन्जॉय केला. मी सुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. खऱ्या अर्थाने महिलांनी आनंदाचा डोह अनुभवला असेच म्हणता येईल.
या कार्यक्रमात उस्फुर्त महिलांनी भाग घेऊन आपल्या वेगवेगळ्याकलेच्या माध्यमातून बक्षिसे मिळवली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आ. मोनिकाताई राजीव राजळे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी उत्कृष्ठरीत्या कार्यक्रमाचे नियोजन केले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद केले.