नाईक संस्थेच्या अध्यक्षपदी परिवर्तनचे कोंडाजी आव्हाड
नाशिक - प्रतिनिधी
व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संमिश्र निकाल लागले असून सर्वाधिक जागा वर तानाजी जायभावे व सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्या प्रगती पॅनलने बाजी मारली.
मात्र, अध्यक्ष पदी परिवर्तन पॅनलचे कोंडाजी मामा आव्हाड व उपाध्यक्ष पदी उदय घुगे यांनी बाजी मारली. तर, सह चिटणीस पदी दिगंबर गिते हे विजयी झाले. सत्ताधारी पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवले गेलेल्या क्रांतिवीर पॅनल आणि मनोज बुरकुले आणि अभिजीत दिघोळे यांच्या नव ऊर्जा पॅनलला या निवडणुकीत भोपळा ही फोडता आला नाही.
या निवडणुकीत सत्ताधारी संचालक, अध्यक्ष यांच्या सह माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पराभव पत्करावा लागला. प्रगती पॅनलचे सर्वाधिक उमेदवार विजयी होऊनही अध्यक्ष पदावर मात्र परिवर्तन पॅनलचे कोंडाजी मामा आव्हाड हे विजयी झाले. त्यांनी विध्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे व तानाजी जायभावे यांचा पराभव केला. कोंडाजी आव्हाड (२२३२) ॲड तानाजी जायभावे २१०४ पंढरीनाथ थोरे १९४९ अशी मते मिळाली. १२८ मतांनी कोंडाजी आव्हाड हे विजयी झाले. तर, सरचिटणीस पदासाठी हेमंत धात्रक २५३२ ( प्रगती ) २४८ मतांनी विजयी झाले. बाळासाहेब सानप २२८४ शिवाजी मानकर १३०८ मते मिळाली.
नाईक शिक्षण संस्थेची 2024 ते 2029 साठीची पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया पार पडली. 29 जागा साठी 118 उमेदवार रिंगणात होते. यंदा प्रथमच चार पॅनलमध्ये निवडणूक झाली असून निवडणुकीसाठी 82 टक्के मतदान झाले होते त्यामुळे निकालाची उत्सुकता निर्माण झाली होती. संचालकांमध्ये प्रगती पॅनल चे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रचारादरम्यान भ्रष्टाचार, गैरकारभार, संस्थेच्या दूरवस्थेसारख्या अाराेप-प्रत्याराेपांनीही ही निवडणूक गाजली