अहमदनगरच्या डॉ. एस. एस. दीपक यांनी शोधून काढला प्राण्यांपासून होणारा नवा आजार; मृत्युच्या दारात गेलेल्या रुग्णाला दिलं जीवदान…!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगरच्या डॉ. एस. एस. दीपक यांनी शोधून काढला प्राण्यांपासून होणारा नवा आजार; मृत्युच्या दारात गेलेल्या रुग्णाला दिलं जीवदान…!
डॉक्टरला तुम्ही आम्ही भूतलावरचा देव समजतो. कारण तो प्रचंड अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला शर्थीचे प्रयत्न करुन जीवदान देतो. अहमदनगर शहरातदेखील नुकताच असा अनुभव आलाय. अहमदनगरच्या डीएसपी चौकातल्या साईदीप रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.एस.एस. दीपक यांनी एका रुग्णाला जीवदान देण्याबरोबरच माणसाला प्राण्यांपासून होणाऱ्या एका नव्या आजाराचा शोध लावलाय.
डॉ. एस. एस. दीपक हे गेल्या ४० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा सदुपयोग नगर जिल्ह्यातल्या जनतेला होत आहे. श्रीगोंदे तालुक्यातल्या येळपणे गावचा एक रुग्ण प्लेटलेट्स कमी, न्युमोनिया, ताप, डेंग्यू, ऑक्सिजनची कमतरता यामुळे प्रचंड अत्यवस्थ झाला होता.
डॉ. दीपक यांनी विशिष्ट प्रकारच्या खास वैद्यकीय तपासण्या केल्या आणि त्या तपासण्यानंतर लेप्टोस्पायरोसिस या नव्या आजाराचा शोध लागला. यासंदर्भात पञकार व प्रतिनिधी यांच्याशी बोलताना डाॕ.एस.एस.दिपक यांनी मत व्यक्त केले.