महाराष्ट्र
92586
10
मेहनत व कष्ट घेऊन यश संपादन केले पाहिजे- हनुमान गोर्डे
By Admin
मेहनत व कष्ट घेऊन यश संपादन केले पाहिजे- हनुमान गोर्डे
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील भालेश्वर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. नवनाथ महाराज शास्त्री (महंत मच्छिंद्रनाथ गड भालगाव), प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध व्याख्याते व शिवचरित्रकार ह.भ.प. कृष्णा महाराज कुऱ्हे(कांबीकर ),विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमान गोर्डे, शिक्षक प्रतिनिधी श्रीकांत सोनवणे, समन्वयक दिगंबर नजन या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी मान्यवरांच्या स्वागतासाठी स्वागत गीताचे गायन केले. यावेळी अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त विविध गुणदर्शनामध्ये एकल नृत्य, नाटिका, गीत गायन, संगीत नृत्य, तसेच गणित विज्ञान अध्यापकसंघ,एन.एम.एम.एस.परीक्षा,खो-खो स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, आंतर शालेय स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमान गोर्डे यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी कष्ट,चिकाटी आणि जिद्द अंगी बाळगली तर कोणत्याही क्षेत्रात अपयश येत नाही,त्यासाठी मेहनत व कष्ट घेऊनच यश संपादन केले पाहिजे, त्यातूनच चांगले व्यक्तित्व व व्यक्तिमत्व घडू शकते, असे स्पष्ट करून विद्यालयाचा चढता आलेख सांगितला.
अध्यक्षीय भाषणातून ह.भ.प. नवनाथ महाराज शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी शिवचरित्रकार ह.भ.प कृष्णा महाराज कुऱ्हे यांनी आपल्या व्याख्यानातून राजे शिवाजी, माता जिजाऊ, तसेच आई-वडील, गुरु यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये यश संपादन करावे असे प्रेरणादायक मार्गदर्शन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक मेजर सुरेशराव गायके, आजिनाथ खेडकर, महादेव खेडकर, तुकाराम केदार, दत्तू बडे, ज्ञानदेव शिंदे, श्रीमती काळे ताई या पालकांची व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाचंग व समन्वयक दिगंबर नजन यांनी केले तर आभार श्रीकांत सोनवणे यांनी मानले
Tags :
92586
10





