महाराष्ट्र
23524
10
३० ग्रामपंचायतींनी थकवले जि. प. चे कर्ज
By Admin
३० ग्रामपंचायतींनी थकवले जि. प. चे कर्ज
कर्ज भरण्यास १० दिवसांची मुदत : अन्यथा होणार कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा परिषदेकडून घेतलेले कर्ज मुदत उलटून गेल्यानंतरही न भरल्याने ग्रामपंचायत विभागाने अशा थकीत ३० ग्रामपंचायतींवर कारवाईचा इशारा आहे. येत्या दहा दिवसांत हे कर्ज भरले नाही, तर सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करू, असे ठणकावल्याने या ग्रामपंचायती धास्तावल्या आहेत.
ग्रामपंचायतींना विविध विकासकामे करण्यासाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनामार्फत जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधीची स्थापना करण्यात येते. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या उत्पन्नाच्या ०.२५ टक्के अंशदान रक्कम जमा करणे बंधनकारक असते. जमा रकमेतून ज्या ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी कर्ज आवश्यक
आहे अशा ग्रामपंचायतींना त्यांच्या उत्पन्न व शिल्लक निधीचा ताळमेळ घेऊन जिल्हा परिषद कर्ज मंजूर करते. कर्ज घेतल्यानंतर ५ टक्के दराने त्याची दहा समान हप्त्यात परतफेड करणे बंधनकारक आहे. जि. प. चे. मुख्य कार्यकारी
अधिकारी आशिष येरेकर यांनी नुकताच यासंबंधी आढावा घेतला असता ही बाब लक्षात आली. त्यांच्या सूचनेनुसार थकीत ग्रामपंचायतींची बैठक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी मागील आठवड्यात घेतली. यासाठी संबंधित कर्जदार
सरपंच, ग्रामसेवक येणार अडचणीत
कर्ज भरण्यात ग्रामपंचायतींनी कसूर केला तर सरपंचासह पदाधिकाऱ्यांवर ३९/१ नुसार कारवाई प्रास्तावित करण्यात येईल व संबंधित ग्रामसेवकावरही शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा देण्यात आला.
ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीत दहा वर्षांपूर्वीचे प्रलंबित कर्ज व नियमित कर्ज परतफेड न करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या समस्या व अडचणी जाणून चर्चा करण्यात आली. याबाबत दादाभाऊ गुंजाळ म्हणाले, काही ग्रामपंचायतींकडे अद्यापही कर्जाचा मोठा भरणा थकीत असल्याचे दिसून येते.
याबाबत विचारणा केली असता सरपंच, ग्रामसेवक यांनी काही दिवसांची मुदत मागितली. त्यांच्या अडचणी विचारात घेता त्यांना पुढील दहा दिवसांची मुदत परतफेडीसाठी देण्यात आली.
Tags :
23524
10





