वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची पाटोदा तालुक्यातील गहिनाथ गडावर प्रमुख उपस्थिती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज शनिवार दि ३-२-२०२४ रोजी पाटोदा तालुक्यातील गहीणीनाथ गड येथे वैराग्य मुर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व आदरनिय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर उपस्थितीत राहुन मनोभावे आरती,पूजा आणि दर्शन घेतले यावेळी गडाचे महंत परमपुज्य ह भ प विठ्ठल महाराज शास्त्री बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंढे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण, अरूण आबा जाधव,बीड जिल्हाअध्यक्ष उध्दव खाडे, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई,मा अरुणभाऊ झांबरे पाटील, दत्तू केसभट पाटील व ईतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.