महाराष्ट्र
12288
10
वंचित बहुजन आघाडी करणार शेवगाव तहसील कार्यालयात काळी दिवाळी साजरी
By Admin
वंचित बहुजन आघाडी करणार शेवगाव तहसील कार्यालयात काळी दिवाळी साजरी
शेवगाव- प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी शेवगावच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांना समक्ष भेटुन लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनात १) शेवगाव शहर व तालुक्यात एकुण १२४ स्वस्त धान्य दुकाने आहेत त्या पैकी बहुतेक स्वस्त धान्य दुकानाचे परवाना धारक हे स्वत: न चालवता दुसर्याच व्यक्ति चावलतात याच कारणाने अन्न धान्यचा काळाबाजार बोकाळला आहे परवाना धारक स्वस्त धान्य दुकान चालवत नसेल तर त्याचा परवाना रद्द करावा २) शेवगाव शहर व तालुक्यातील बहुतेक शिधा धारकांना कित्येक वर्षापासुन अन्नधान्य मिळत नाही, शिधापत्रिका आहे परंतु ऑनलाइन नाही, स्वस्त धान्य दुकाने बंदच असतात अनेक परवाना धारक एका गावात राहतात दुकान वेगळ्याच गावात चालते , दिवाळी चार दिवसावर आलेली असतांना आद्यापही शासनाकडुन आलेला आनंदाचा शिधा किट गोर गरीब कुटुंबांना मिळाला नाही काही स्वस्त धान्य दुकानदारांकडे थोड्या प्रमाणात आला परंतु सरवर बंद आहे, दुकानदारांना आनंदाचा शिधा ३०,४०,५० किट कमी मिळाला,किट मिळेल पण गहु, तांदुळ मिळणार नाही अशी दैनिय अवस्था झालेली आहे गोडावुन किपर गोडावुनला उपस्थितीत नसतो तसेच शेवगाव येथे कार्यरत असलेले पुरवठा आधिकारी गैरहजर असतात,त्यांचा कारभार बाहेरचा व्यक्ति चालवतो अशा एक ना अनेक लेखी तक्रारी या अगोदर वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आहे आंधळ दळतय कुत्र पीठ खातय अशी परिस्थिती पुरवठा विभागाची झाली आहे वरील कामकाज सुरळीत करावा वरील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात शेवगाव तहसील कार्यालयात त्रस्त शिधा पत्रिका धारक, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी काळी दिवाळी साजरी करतील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे या प्रसंगी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, उपाध्यक्ष राजेंद्र नाईक,शेख सलीम जिलाणी, रविन्द्र निळ,हाजी नुराभाई कुरैशी,उत्तम निळ, रविन्द्र आर्जुन निळ व ईतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
Tags :
12288
10





