गोमाता शाळेतील गाईसाठी शासनाच्या माध्यमातून चागली व्यवस्था देण्यासाठी प्रयत्नशील - शेखर मुंदडा
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करडवाडी येथील श्रीकृष्ण गोशाळेचे गोपालक दीपक काळे महाराज यांच्यासह त्यांच्या पत्नी व त्यांच्या दोन मजुरांना काही व्यक्तींनी मारहाण करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला, यापुढे गोरक्षकांवरील होणारे भ्याड हल्ले खपवून घेणार नाही, असा इशारा गोसेवा आयोगाचे अध्यक्ष नामदार शेखर मुंदडा यांनी दिला आहे. शिरापूर येथील श्रीकृष्ण गोशाळेचे गोपालक दीपक काळे महाराज यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच तिसगाव येथील अनधिकृत कत्तलखाने बंद करण्यासाठी तसेच गोपालकांना संरक्षण देण्यासाठी कत्तलखान्यातून सोडून आणलेल्या गोमातांना सांभाळण्याची व त्यांना चारा पाण्याची व्यवस्था प्रशासनाने करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महंत भास्करगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाथर्डी तहसील कार्यालयावर संत महंत व वारकरी संप्रदायाच्या वतीने मोर्चा देखील काढण्यात आला होता. शनिवारी याच घटनेच्या संदर्भात गोसेवा आयोगाचे अध्यक्ष नामदार शेखर मुंदडा यांनी श्रीकृष्ण गोशाळेचे
गुडेवा आयोगाचे अध्यक्ष गोपालक दीपक महाराज व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देत गो शाळेतील गाईंची पाहाणी केली. दिपक महाराज यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा निषेध व्यक्त करत भविष्यात या गोमाता शाळेतील गाईसाठी शासनाच्या माध्यमातून चागली व्यवस्था देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, सर्वांनी गो शाळेस मदत करावी, असे आवाहन करत प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरी गोमाता असली पाहिजे आणि प्रत्येकाने गोमातेचे पालन पोषण करून हिंदू संस्कृती जोपासण्याचे आवाहन या वेळी मुंदडा यांनी केले.