महाराष्ट्र
32774
10
आपली शब्द संपत्ती वाढवण्यासाठी वाचन खूप उपयुक्त- प्राचार्य शेषराव पवार
By Admin
आपली शब्द संपत्ती वाढवण्यासाठी वाचन खूप उपयुक्त- प्राचार्य शेषराव पवार
पाथर्डी प्रतिनिधी:
थोर भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी भूषविले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभाग अंतर्गत करण्यात आले होते.प्राचार्य डॉ. पवार यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विकास गाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्याना वाचनाचे महत्व विषद करतांना विद्यार्थ्यांनी मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर मर्यादित करावा. वर्तमान पत्रे, मॅगेझिन, मासिके वाचतांना वाईट बातम्या वाचण्याऐवजी सकारात्मक बातम्या, वैचारिक लेख, संपादकीय लेख वाचले पाहिजेत.मोबाईलचा मर्यादित वापर केला पाहिजे, आपला वेळ स्वतःच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिला पाहिजे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील संघर्षाबद्दल तसेच त्यांच्या संशोधन कार्याबाबत माहिती दिली. आपल्या भाषणामध्ये पुढे ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी वाचन केल्यामुळे ज्ञान प्राप्ती होते, वाचनामुळे आपल्या अनेक गोष्टी सोप्या होऊन जातात . त्यामुळे वाचन ही चांगली सवय आहे. सद्या आपल्याकडे ज्ञान मिळविण्यासाठी भरपुर साधने उपलब्ध आहेत.अशा साधनाचा वापर करून आपण ज्ञान संपादित केलें पाहिजे, असे आव्हान केलें.
महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ .शेषराव पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषणात वाचनाचे महत्व विषद करतांना पुस्तके कशा प्रकारे आपल्या जीवनात उपयोगी ठरू शकतात, वाचन ही काळाची गरज आहे. दररोज प्रत्येकाने कमीत कमी पाच ते दहा पाने वाचली पाहिजेत. एक चागले पुस्तक शंभर मित्रासारखे असते. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे, तसेच आकलन शक्ती वाढवणे या हेतूने महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाते. वाचन प्रेरणा दिवस साजरा केल्यामुळे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत होते. दररोजच्या आपल्या कामातून थोडा वेळ काढून वाचन केले, तर आपली संस्कृती लोप पावणार नाही. आपली शब्द संपत्ती वाढवण्यासाठी वाचन खुप उपयुक्त ठरते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. अशोक वैद्य यांनी केले तर आभार एस. वाय. बी. एस्सी.ची विद्यार्थिनी अमृता इधाटे हिने मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. डॉ. मुक्तार शेख, प्रा. दत्ताराम बांगर, प्रा. डॉ. जगन्नाथ बर्शिले, डॉ. नितीन धुमने, डॉ.भाऊसाहेब घोरपडे, डॉ. पगारे बी. वाय. , प्रा. अनिता पावसे, प्रा. सूर्यकांत काळोखे, डॉ. धीरज भावसार, प्रा. जोशी, प्रा. म्हामदे, प्रा. उध्दव घाटूल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होते.
Tags :
32774
10





