महाराष्ट्र
3615
10
शाळेच्या काटेरी कुंपणाला आग लागली का लावली?
By Admin
शाळेच्या काटेरी कुंपणाला आग लागली का लावली?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून, पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील वृद्धेश्वर विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर देताना बाहेरील टवाळखोरांचा त्रास होऊ नये म्हणून विद्यालय प्रशासनाने विद्यालयाच्या मागून चोहोबाजूने बाभळीच्या काट्या टाकल्या होत्या.
परंतु परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच्या रात्रीच काही तरुणांनी शाळेनी टाकलेल्या काट्या पेटून दिल्या. यामुळे गोंधळ उडाल्याने शाळेने टाकलेल्या काट्यांना आग लागली का लावली? हा आता चर्चेचा विषय ठरला आहे.
तिसगावात बारावीचे परीक्षा देण्यासाठी तिसगावसह मिरी मढी निवडूंगे या भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. विद्यार्थ्यांना तिसगावमधील काही तरुण कॉपी पुरवण्यासाठी प्रयत्न करतात. बाहेरच्या तरुणांमुळे वर्गात परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. बाहेरच्या तरुणांचा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शाळेने इमारतीच्या चोहोबाजूने बाभळीच्या काट्या टाकून बाहेरच्या व्यक्तींचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला; परंतु परीक्षा सुरू होण्यापूर्वीच आधल्या रात्री या सर्व काट्या पेटवून देण्यात आल्याने मोठा आगडोंब झाला.
यानंतर वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अग्निशमक गाडी बोलवून आग विझवण्यात आली. मंगळवारी परीक्षा सुरू झाली, त्यावेळी अनेक बाहेरच्या तरुणांनी ओळखीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पहिल्याच दिवशी या तरुणांना पिटाळून लावले.
'सीईओ' येरेकरांची परीक्षा केंद्रांना भेट
बारावी व दहावीच्या परीक्षेत पाथर्डी तालुक्यात कॉपी होत असल्याची चर्चा पुढे आल्याने बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तिसगावसह तालुक्यातील इतरही काही परीक्षा केंद्रांना भेटी देत आढावा घेतला.
Tags :

