टाकेद विद्यालयाचा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक
नाशिक - प्रतिनिधी
नाशिक येथे 50 वे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच पंचवटी एज्युकेशन सोसायटी नाशिक येथे संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शनात इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज विद्यालयातील
6 ते 8 प्राथमिक गटातून विद्यार्थिनी प्रतीक्षा संतोष परदेशी व मार्गदर्शक शिक्षक श्री दिनकर चव्हाण व भालेराव सर यांना आदिवासी गटातून तृतीय क्रमांकाचा मान मिळाला. विद्यालयाच्या वतीने निवड प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन
सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे विद्यालयाचे प्राचार्य साबळे सर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , भारत सर्व सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष राजेंद्र नलगे साहेब व सन्माननीय सचिव प्रकाश जाधव साहेब इतर संस्था पदाधिकारी व सदस्य तसेच टाकेद व टाकेद परिसरातील सर्व ग्रामस्थ , मान्यवर यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.