महाराष्ट्र
नाना पटोल्या माझ्या समोर ये आणि... चंद्रकात पाटील भयानक चिडले थेट अरे तुरे वर आले
By Admin
नाना पटोल्या माझ्या समोर ये आणि... चंद्रकात पाटील भयानक चिडले थेट अरे तुरे वर आले
चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील(BJP leader and Higher and Technical Education Minister Chandrakant Patil ) यांच्यावर शाईफेक झाली आहे.
पिंपरीत एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ 3 जणांना ताब्यात घेतले. समता सैनिक मनोज भास्कर गरबडे याला अटक करण्यात आलीय. दरम्यान या शाईफेकमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. चंद्रकात पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress leader Nana Patole) यांच्यावर निशाणा साधला आहे. टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांचा एकेरी उल्लेख केला.
महापुरूषांवरील वक्तव्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमध्ये निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. दरम्यान मी कुणालाही घाबरत नाही, भ्याड हल्ले का करता, हिंम्मत असेल तर समोर या असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले. तर दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अशा प्रकारची शाईफेक चुकीची असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, या हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि आपली भूमिका स्पष्ट करताना नाना पटोले यांच्यावर घणाघाती टीका केली.
चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
औरंगाबादेत मराठवाडा विद्यापिठाच्या संतपीठाच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. "सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते. 10 कोटी देणार लोक आहेत ना"असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
समोर या आणि चर्चा करा
महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करुन चंद्राकात पाटील यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. 'चंद्रकांत पाटील यांना भीक, लोकवर्गणी व देणगी यातील फरक तर कळतो का ? असा सवाल देखील नाना पाटोले यांनी केला होता. नाना पटोल्या माझ्या समोर ये आणि चर्चा कर असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिले आहे. माझ पूर्ण भाषण अध्यात्मिक असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. बुद्धी इतकी भ्रष्ट नको होऊ द्या. नाना पटोले मा माझे चांगले मित्र आहेत. पण अशी टीका नका करु असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
Tags :
70318
10