अंबादास शेळके मनसे शेतकरी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी
पाथर्डी प्रतिनिधी:
शहरातील युवा कार्यकर्ते अंबादास शेळके यांची मनसे शेतकरी सेनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी केली. राज ठाकरे यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याचे अविनाश पालवे यांनी सांगितले.
मनसे पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला असून महाराष्ट्रभर मनसे शेतकरी सेना शेतकऱ्यांच्या गोरगरीब कामगार कष्टकरी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करत आहे.
मनसे म्हटले की, काम होण्याचा विश्वास यामुळे पक्षाची मोठी जबाबदारी आपल्यावर देत आहोत. येणाऱ्या काळात तालुक्यातील शेतकरी व जनतेला मनसे पक्षाशी जोडण्याचे काम करा, असे अविनाश पालवे म्हणाले.
या निवडीबद्दल मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ , शहराध्यक्ष संदिप काकडे, शहर उपाध्यक्ष सोमनाथ फासे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रविण शिरसाट, तालुका उपाध्यक्ष अशोक आंधळे, समर्थ मांजरे रवी गायकवाड, विशाल कुटे, ऋतिक मेरड, संभाजी शेळके, सोमा कदम, अक्षय उराडे यांनी अभिनंदन केले आहे.