श्री क्षेत्र मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी पोलिस बंदोबस्तात पेटवली
नगर सिटीझन live टिम-
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर प्रशासनाने मढी यात्रेला बंदी घातल्याने गोपाळ समाजाची मानाची होळी मानपानाचे किरकोळ ताणतणाव वगळता पोलिस बंदोबस्तात शांततेत पेटवीण्यात आली .
रविवारी ( ता .९ ) रोजी सायंकाळी पाच वाजता गोपाळ बांधव कडेकोट पोलीस बंदोबस्तात मानाच्या गौवऱ्या घेण्यासाठी कानीफनाथ गडावरती आले . यावेळी देवस्थान समितीने समाजचे मानकरी माणीक लोणारे, रघुनाथ काळापहाड, नामदेव माळी, पुंडलिक नवघरे , हरिभाऊ हंबीरराव, सुंदर गिऱ्हे यांना मानाच्या गौवऱ्या दिल्या. मानाच्या गौवऱ्या दिल्यानंतर पोलिस बंदोबस्तात नाथांचा जयजयकार करत पूर्व नियोजित जागेवर दत्त मंदिर जवळ - वाजत गाजत गोवऱ्या पोहोचल्या .तेथे मानकरी गोलाकार बसले पूजा विधी झाल्यावर पाच वाजता होळी पेटली . होळी पेटताच गोपाळ बांधवांनी नाथांचा जय जयकार करत होळी भोवती प्रदक्षिणा पुर्ण केल्या.चैतन्य कानिफनाथांच्या गडाच्या बांधकामाला कष्टाची कामे अत्यंत सेवाभावी पद्धतीने गोपाळ समाजाने केल्याने नाथांनी स्वतः होळी पेटवण्याचा मान गोपाळ समाजाला दिला. या दिवशी मढीचे ग्रामस्थ होळीचा सण साजरा करत नाहीत. होळीचा सण सार्वजनिक रीत्या साजरा न करणारे मढी गाव राज्यात एकमेव ठरले आहे . समाजातील वादामुळे मागील वर्षी दोन होळ्या पेटवल्या होत्या .नव्या जागेवर होळी पेटवून द्यावी असा आग्रह मानकऱ्यायांनी धरल्याने प्रशासन व गोपाळ बांधवांमध्ये काही काळ तणाव वाढला .पारंपारिक जागेवर होळी पेटवण्यास प्रशासन ठाम राहिले .त्यामुळे जुन्या जागेवर होळी पेटली .