मोनिका राजळेंचा प्रताप ढाकणेंना मोठा धक्का; 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत.
पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरवात झाली. पाथर्डी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला दणका दिला आहे.
भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या गटाने पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 17 जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या गटाला अवघी एक जागा मिळाली आहे. त्यामुळे प्रताप ढाकणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
याआधी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत ढाकणेंच्या गटाची सत्ता होती. मात्र, यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी मतदारसंघातील बाजार समिती त्यांच्या हातातून हिसकावली आहे.
आमदार मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने 18 पैकी 17 जागा जिंकत ढाकणे यांच्या जगंदबा मंडळाला धोबीपछाड दिली. त्यामुळे पाथर्डी बाजार समितीत प्रताप ढाकणे यांच्या गटाला जोरदार धक्का बसला आहे.