अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन अॅड्. उदयराव शेळके यांचे दिर्घ आजाराने दु:खद निधन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन अॅड्. उदयराव शेळके वयाच्या ४६ वर्षी दिर्घ आजारामुळे दु:खद निधन झाले. मुंबईमधे उपचार सुरु असताना आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.त्यांच्या जाण्यामुळे नगर जिल्ह्यासह पारनेर व राज्याच्या विशेषत: सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.महानगर बँकेचे संस्थापक साॅलीसीटर स्वर्गीय गुलाबराव शेळके यांचे ते चिरंजीव होते.वडीलांच्या पश्चात उदयराव यांनी महानगर बँकेची धुरा सर्थपणे चालवली होती.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई, २ मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या गावी पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन,येथे अंतिम संस्कार होणार आहे.देशाचे नेते शरद पवार,राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार आदींसह अनेक नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले आहे.त्यांच्या जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन अॅड्. उदयराव शेळके यांचे दु:खद निधन
नगर पारनेर सह,राज्याच्या सहकार क्षेत्रावर शोककळा..
वयाच्या ४६ व्या वर्षी दिर्घ आजाराने झाले निधन..
अंत्यविधी रविवार दि.१२ फेब्रुवारी रौजी सकाळी पारनेर तालुक्यातील पिंप्रीजलसेन येथे होणार
देशाचे नेते शरद पवार,विरोधी पक्षनेते अजितदादांसह अनेकांनी केले कुटुंबियांचे सात्वन.