पाथर्डी पंचायत समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
पाथर्डी प्रतिनिधी:
शहरातील पंचायत समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवाजी महाराजांचा विजय असो! अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराज स्फूर्ती गीतांवर रेकॉर्ड डान्स केला. यावेळी प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेंची उपस्थिती होती.
त्यानंतर गुरु आनंद संगीत मंडळाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या कार्यावर विविध गीतांच्या कार्यक्रमानी प्रेक्षकांना मंत्रमुक्त केले. शाहीर भारत गाडेकर यांनी 'शिवाजी महाराजांचा पोवाडा', 'महाराष्ट्र गीत' सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गायक बिपिन खंडागळे यांनी 'दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमी वर'या गाण्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. राजेंद्र चव्हाण यांनी ढोलकीची साथ दिली तर हार्मोनियमची साथ सचिन साळवे यांनी दिली. सर्व गीतांना संजय राजगुरू यांनी साथसंगत केली. या बहारदार गीत गायनांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रतापराव ढाकणे हे उपस्थित होते. त्यांनीही महाराष्ट्र गीताचे सहगायन करून गाण्याच्या तालावर ठेका धरला.
यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी अण्णासाहेब गहिरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पालवे, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार, कार्यालयीन अधिक्षक देऊळगावकर, उपअभियंता अनिल सानप, देविदास दहिफळे, ग्रामसेवक आदिनाथ नेहरकर, सुधिर खेडकर, अमोल तांदळे, राजेंद्र खाडे व पंचायत समितीचे सर्व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.