पाथर्डी : महिलेला शिवीगाळ, अॅट्रॉसिटीचा गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेतीच्या वादावरून पाथर्डी तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपीविरोधा पाथर्डी पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.
आरोपी रोहिदास मोरेच्या घरी जाऊन पीडित महिलेने 'आमची शेती तुम्हाला वाट्याने कसण्यासाठी दिली होती. ती माझ्या पतीला फसवून तुमच्या नावे का करून घेतली. आमच्या वाट्याचे धान्यसुद्धा दिले नाही. आता, धान्य आम्हाला देऊन टाका व जमीन परत आमच्या नावावर करून द्या, अशी मागणी केली. यावर मोरेने पीडित महिलेला शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केला.