महाराष्ट्र
एस टी बस व क्रेनचा भीषण अपघात;पुणे- अहमदनगर महामार्गावरील घटना
By Admin
एस टी व क्रेनचा भीषण अपघात;पुणे- अहमदनगर महामार्गावरील घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सणसवाडी नजीक कल्याणी फाट्यावर अपघातात बारा प्रवाशी जखमी
सणसवाडी (ता. शिरुर) नजीक पुणे नगर महामार्गावर कल्याणी चौक येथे एस टी व क्रेनचा भीषण अपघात होऊन झालेल्या अपघातात तब्बल 12 प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन एम एच १४ बी टी २८०० हि एस टी बस अहमदनगर बाजूने पुणे बाजूकडे जात असताना कल्याणी चौकातून एसटी च्या पुढे जात असलेला एम एच १२ टी वाय ४५०२ या क्रेन चालकाने अचानक क्रेन रस्त्यावरुन अचानकपणे उजव्या बाजूकडे वळवला. दरम्यान अहमदनगर बाजूकडून आलेल्या एसटीची क्रेनला धडक बसून अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस हवालदार राजेश माने, पोलीस नाईक राकेश मळेकर, महेंद्र पाटील, पोलीस मित्र खंडेराव चकोर, बापू भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने कोरेगाव भीमा येथील खाजगी रुग्णालयात हलवले, तर यावेळी झालेल्या अपघातात सारिका अजित फुले रा. सुस रोड पुणे, सुमन सुर्यकांत भोसले व जयंत सुर्यकांत भोसले दोघे रा. कात्रज पुणे, राहुल दत्तात्रय काफे रा. कोपरगाव अहमदनगर, अरमान अमरफारु खान रा. शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे, निर्मला शिवाजी हापसे व शिवाजी देवराव हापसे दोघे रा. राहुरी अहमदनगर, अश्विनी विशाल आवारे व विशाल सखाराम आवारे दोघे रा. निंबूडी अहमदनगर, शोभा भारत हिवाळे
. नाशिक, वीरेंद्र दिनकर बनसोडे रा. वाटेगाव, शिवाजी अनिल दाभाडे रा. शिरुर पुणे हे सर्व बारा प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.
घडलेल्या घटनेबाबत एस टी चालक विरेद्र दिनकर बनसोडे (वय ४७) रा. वाडेगाव ता. वाळवा जि. सांगली यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून शिक्रापूर पोलिसांनी सुरजकुमार अशोक कुमार रा. कुंजहित आजमगड देवगड उत्तरप्रदेश याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने व पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.
Tags :
144284
10