शेतकऱ्यांना सरकारने ओल्या दुष्काळ पीक नुकसान मदत तात्काळ द्यावी,शेतकऱ्यांची मागणी
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे दोन महीन्यापुर्वी
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये कपाशी, सोयाबीन,तुर पिक पाण्यात राहून पार सडून गेली होती या पिकांचे शासनस्तरावरुन गाव स्तरावर तहसिल कार्यालय यांच्या मार्फत तलाठी,ग्रामसेवक मार्फत पीक नुकसान पाहणी व पंचनामे करून बरेच दिवस झाली मात्र शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही.तसेच तालुक्यातील तहसिलमध्ये शेतकऱ्यांची मदत फाईल बंद अवस्थेत आहे. शेतकरी शासनाच्या मदतीची आतुरतेने वाट बघत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी त्वरीत या ओला दुष्काळ मुळे नुकसान झालेल्या पीक नुकसान संबंधी त्वरीत निर्णय घ्यावा.
एका बाजूने अमाप खर्च करून सुध्दा ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेतीतून काहीच मोबदला मिळाला नाही उलट नांगरणी, पेरणी, खुरपणी,यावर झालेला खर्च सुद्धा मिळाला नाही आणि दुसऱ्या बाजूने शेतकरी लंपी आजाराने हैराण झाला आहे दुधव्यवसायावर परिणाम होवून आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी हवालदील झाला आहे शासनाने शेतकऱ्यांना मदत देवून दिलासा द्यावा.
जिल्ह्यातील सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी. शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवावा.कारण प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचा वारंवार अपमान होत आहे. कारण व्यापारी चांगल्या पिकाच्या मालाला कवडीमोल भाव देतात. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.यामुळे
शेतकऱ्यांना सरकारने ओल्या दुष्काळाची मदत तात्काळ द्यावी करावी अशी पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे.