पाथर्डी शहराच्या पाणी पुरवठा ,नागरिकांच्या समस्या संबंधी नगरपालिकेला निवेदन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहराचा गेल्या सात ते आठ दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे तो तत्काळ चालू करण्यात यावा व तसेच शहरातील इतर नागरी समस्याबाबत पालिका मुख्याधिकारी यांना नागरिकांच्या वतीने
माजी नगराध्यक्ष दिनकरराव पालवे, आपचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल पाखरे, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री नागनाथ गर्जे,आर.पी.आय.चे महेश अंगारखे, काँग्रेसचे नवाबभाई शेख, अशोक ढाकणे व शब्बीरभाई शेख यांनी दिले
तसेच पाणी प्रश्नाबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा यासाठी प्रांताधिकारी यांना मोबाईलवरून चर्चा करून जनतेची पाण्यासाठी होत असलेली पिळवणूक ताबडतोब थांबवावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला तसेच यावेळी प्रांताधिकारी यांनी ताबडतोब पाणीपुरवठा चालू करण्याचे आश्वासन दिले.