महाराष्ट्र
461
10
जगताप व काळे यांच्यात ठिणगी,काळे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
By Admin
जगताप व काळे यांच्यात ठिणगी,काळे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर शहराला हैदराबाद, पुणे, बंगलोरच्या धर्तीवर आयटी हब करणार, असल्याचा सत्ताधारी आमदार संग्राम जगताप यांच्या दाव्याला काॅंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आव्हान देणारे प्रसिद्ध पत्रक काढले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी नगरमध्ये आयटी पार्कच्या मुद्द्यांवर आमने-सामने आले आहेत. त्यावरून दाेन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुढील काळात संघर्ष तीव्र हाेणार असल्याचे दिसते आहे.
उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा एमआयडीसीमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून दौरा झाला. यावेळी उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावणार असे जगताप यांनी म्हटले होते. त्याआधीच जुलै महिन्यामध्ये किरण काळे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये एमआयडीसीतील उद्योजकांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. तटकरे यांच्या नगर दौ-या पूर्वीच मागील बुधवारी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या समवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात बैठक घेतली. थोरात यांनी संबंधित खात्यांचे विविध मंत्री, अधिकारी यांच्याशी जुलै महिन्यामध्ये केलेल्या पत्रव्यवहाराच्या माहिती काळे यांनी दिली होती. त्यानंतर आता काळे यांनी जगताप यांची आयटी पार्कच्या मुद्द्यावरून पोलखोल करीत गंभीर आरोप केल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव काळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणास्तव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काही कार्यकर्त्यांसोबत एमआयडीसी येथील आयटी पार्कला नुकतीच भेट दिली होती. यावेळी त्यांनी येथील बजाज फायनान्स, बजाज फिन्सर कंपनीचे कॉल सेंटर इथे बळजबरीने प्रवेश करून येथील तक्रारदार महिलेचा हाथ पकडून ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच कार्यालयातील महिलांना दमदाटी करत मी काँग्रेस पक्षाचा शहर जिल्हा अध्यक्ष आहे, माझ्या नादी लागू नका, सगळे धंदे बंद करा, मी तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. सहायक निरीक्षक युवराज आठरे तपास करत आहेत.
Tags :

