पाथर्डी - कृषिसेवा केंद्राचे तालुक्यात मोठे नुकसान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांनाचे मोठ्या स्वरूपात नुकसान झाले आहे. तालुक्यातील कोरडगाव व परिसरात सर्वाधिक पाणी शेती, वाडी, वस्ती आणि गावात शिरल्याने घरे, शेत जमीन, पिके ,घरातील संसार उपयोग वस्तू पाण्यात वाहून गेले असून व्यापारी वर्गाचे ही नुकसान झाले आहे.
कोरडगाव येथील अंकुश काकडे यांच्या मालकीची असलेली भगवान बाबा कृषी सेवा केंद्राचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली असून लाखो रुपयांचे खते पाण्यात विरघळून गेली आहे. मागील आठवड्यात रातभर झालेल्या मुसळधार पांवसाने नाणी नदीला पूर येऊन कोरडगाव गावात पाणी शिरले त्यामध्ये भगवान बाबा कृषी सेवा केंद्राची या पाण्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.