या ठिकाणी कांद्याला मिळाला अठराशे रुपयापर्यत भाव
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १ हजार ४६८ गोणी कांद्याची आवक झाली. या कांद्याला अठराशे रुपयांपर्यंत भाव मिळाला.
अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत व कांदा ५० किलो बारदान गोणीत बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.