पाथर्डी -यशस्वी सापळा रचून लाचलुचपत पथकाने केली कारवाई
By Admin
पाथर्डी -यशस्वी सापळा रचून लाचलुचपत पथकाने केली कारवाई
नगर सिटीझन रिपोर्ट live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पंचायत समिती पाथर्डी येथे अहमदनगर लाचलुचपत पथकाने कारवाई केली.या प्रकरणात आरोपी रामभाऊ दुधाराम राठोड, वय ५३ वर्ष, धंदा - नौकरी, शाखा अभियंता, वर्ग - २, बांधकाम विभाग, प.स. पाथर्डी.
रा- प्लॉट नं. १८८, नाथनगर, पाथर्डी. जि - अहमदनगर या व्यक्तीने लाचेची ८००० मागणी केल्याने तसेच तडजोड ५००० लाचेची मागणी -* ता.२८/०७/२०२१ केली.तसेच ५००० हजाराची
लाच स्विकारली.दिनांक २९/०७/२०२१ लाच घेतली.
लाचेचे कारण यातील तक्रारदार यांच्या मुलाने पंचायत समिती पाथर्डी अंतर्गत ग्रामपंचायत कामतशिंगवे येथील 0.33 ते 1/600 या रस्त्याचे दुरुस्ती कामाचे कॉन्टॅक्ट घेऊन सदर काम पूर्ण करून त्या कामाचे ₹ ४,००,०००/- चे बील मंजुरी करीता जि.प.अहमदनगर येथे पाठविण्यासाठी, केलेल्या कामाचे एम.बी.रेकॉर्ड वर सही करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे बिलाचे रक्कमेच्या २% प्रमाणे ₹ ८०००/- लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक २८/०७/२०२१ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष आरोपी लोकसेवक यांनी ₹ ८०००/- ची मागणी करून तडजोड अंती ₹ ५०००/- स्विकारण्याचे मान्य केले. आज दिनांक २९/०७/२०२१ रोजी आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष ₹ ५०००/- लाचेची रक्कम पंचायत समिती पाथर्डी येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे
सापळा अधिकारी दिपक करांडे पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर,पर्यवेक्षण अधिकारी हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
सापळा पथक शाम पवरे, पोलीस निरीक्षक, पो ना.रमेश चौधरी, पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, महिला पोलिस अंमलदार संध्या म्हस्के, राधा खेमनर, चालक पो हवा हारुण शेख, पोलीस नाईक- राहुल डोळसे तसेच मार्गदर्शक -मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक ,मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक,
मा.श्री.सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.,आरोपीचे सक्षम अधिकारी, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. अहमदनगर .
यांनी विशेष कामगिरी केली.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.असे आवाहन
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
*@ टोल फ्रि क्रं. १०६४* यांनी केले आहे.

