'या' तालुक्यात चक्क पोलिसांवरच नागरीकांचा हल्ला, पोलिसांना जीव वाचवण्यासाठी पळावे लागले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शुक्रवार 07 मे 2021
संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.चक्क पोलिसावरच जमावाने हल्ला केला आहेत.तसेच पोलिसांना जीव वाचवण्यासाठी पळावे लागले.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये एक संतापजनक घटना घडली. संगमनेरमध्ये रस्त्यावर जमा झालेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलीस गेले असता पोलिसांना हिंसक अनुभवाला सामोरं जावं लागलं. कोरोनाच्या काळात झालेली गर्दी पोलीस हटवत असल्याचं पाहून जमावाचा संताप अनावर झाला आणि जमावानेच पोलिसांवर हल्ला केला.
पोलिसांच्या तुलनेत जमावाची संख्या मोठी असल्याने पोलिसांना बळाचा वापर करणेही शक्य नव्हते. जमाव आक्रमक होऊन हल्ला करत असल्याचं दिसल्यावर पोलिसांना तिथून पळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. या घटनेमुळं संगमनेरमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झालाय.
-
संगमनेरमधील गुरुवारी रात्री तीनबत्ती चौकात मोठा जमाव एकत्र आला होता. कोरोना काळात जमावबंदी असल्यामुळे पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे संतापलेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला करत दगडफेक करायला सुरुवात केली.
पोलिसांच्या तुलनेत जमावाची संख्या मोठी असल्याने पोलिसांना बळाचा वापर करणेही शक्य नव्हते. जमाव आक्रमक होऊन हल्ला करत असल्याचं दिसल्यावर पोलिसांना तिथून पळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. या घटनेमुळं संगमनेरमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झालाय.
-
वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं अनर्थ टळला. मात्र पोलिसांवर अशा प्रकारे जमावाकडून हल्ला होण्याचा प्रकार घडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. या प्रकऱणी १५ अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.