मराठा समाजाने निवडणूकांवर बहिष्कार टाकल्या शिवायआरक्षण मिळणार नाही.- डॉ-कृषिराज टकले
मराठा समाजाने आतापर्यंत अनेक मूक मोर्चे काढले आंदोलन केली परंतु मराठा आरक्षण मिळाले नाही कारण मराठा समाजामध्ये एक जूट नाही. आतापर्यंत मराठा समाजाने एकजूट वोट बँकेतून दाखवली पाहिजे होती. आंदोलनातून दिसलेली एकजूट मतदानातून दिसली असती तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता असे मत
पाथर्डी तालुक्यातील हञाळ येथील स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षण तरुणांसाठी गरजेचे आहे मात्र काही राजकीय मंडळी फक्त स्वार्थासाठी मराठा समाजाचा वापर करत आहे याला मराठा समाज बळी पडत आहे मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये बहिष्कार टाकला पाहिजे तरच मराठ्यांचे प्रश्न सुटू शकतात लॉकडाऊन नंतर स्वाभिमानी मराठा महासंघ राज्यांमध्ये जनजागृती करून मराठा समाजाला याविषयी जागृत करणार आहे,मराठा लोक प्रतिनिधी यांनी मराठा आरक्षणावर बोलते व्हावे अन्यथा चालते व्हावे अशी भूमिका महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी मराठा महासंघ घेणार आहे असे जाहीर आव्हान स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अर्चना धुळे ,युवक प्रदेश कार्याध्यक्ष चेतन आहेर, जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे, योगेश गायकवाड , कार्याध्यक्ष किशोर लोढे , संपर्कप्रमुख सचिन भोसले , शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर, निलेश दरेकर ,महिला जिल्हाध्यक्ष मनीषा निमसे ,मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे्, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल म्हस्के ,नेवासा तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार, अजय जगताप ,दत्तात्रेय तोडमल आदींनी केले आहे.