पाथर्डी- कोविड लसीकरण मोहीमेत सुसञता व सुधारणा करण्याची काँग्रेसची मागणी
By Admin
कोवीड लसीकरण मोहीमेत सुसत्रता व सुधारणा करण्याची काँग्रेसची मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 09 मे 2021
पाथर्डी येथे कोवीड -१९ लसीकरण करण्यासाठी अजंठा चौकात नुकतेच चालू केलेल्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळली असून प्रशासनाकडून याबाबत कुठलेही नियोजन केले गेले नाही. सोशल डिस्टन्सींगचा अभाव आणि अनियोजित वितरण व्यवस्थेमुळे परिसरात अधिकच कोवीड संसर्गाची भिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांत भिती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या आरोग्याबाबत प्रशासनाला जाग यावी याकरता पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे साहेब व ठाणे अंमलदार, पाथर्डी पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले.
६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षापुढील नागरिकांसहीत उर्वरित पात्र लोकांना क्रमबध्द रित्या लसीकरण करुण पहिल्या ढोस घेतलेल्या नागरिकांसाठी राहिलेले ढोस नियोजनबद्ध रितीने उपलब्ध व्हावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच शहरात प्रभागनिहाय कसबा, तनपुरवाडी, हंडाळवाडी व उपनगरासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करावीत.पोलिस संरक्षणात लसीकरण आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करून नागरिकांना लसीबाबत पूर्वसूचना देण्यात याव्यात. लसीकरणाबाबत प्रबोधन करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या.नायब तहसीलदार पंकज नेवसे साहेब यांची पाथर्डी तालुका काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन याबाबत चर्चा केली . आणि लसीकरण केंद्रामध्ये त्वरित सुसूत्रता आणावी अशी मागणी केली
वरील मागण्या चे निवेदन पाथर्डी चे नायब तहसीलदार माननीय पंकज नेवसे साहेब यांच्याकडे आणि पोलिस बंदोबस्तासाठी पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये ठाणे अंमलदार श्री पांडुरंग बडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले, यावेळी निवासी नायब तहसीलदार नेवसे साहेब यांनी सांगितले की आज संध्याकाळी पाच वाजता प्रशासनाची या संदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करत आहोत व आपल्या मागण्या संदर्भात योग्य ते निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिले.याप्रसंगी पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा अहमदनगर अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नासिर शाहनवाज शेख,अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी सह सेक्रेटरी प्राध्यापक जालिंदर काटे पाथर्डी तालुका पाहुणे सेवादल अध्यक्ष किशोर डांगे सर ,पाथर्डी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रवींद्र पालवे, पाथर्डी तालुका एस.सी. काँग्रेस अध्यक्ष गणेश दिनकर, पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस आदिनाथ देवढे, पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस अनिल साबळे, पाथर्डी तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जुनेद पठाण ,पाथर्डी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष दत्ता पाठक , अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जब्बार आतार, शहजादे भाई शेख , दिनकर भाऊ आदींची उपस्थिती होती

