नगर जिल्ह्यासह सर्व तालुक्यातील ६६ गावांत ७८ पाणी नमुने दुषित
By Admin
नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ६६ गावांत ७८ पाणी नमुने दुषित
नगर सिटीझन live टिम-
जिल्ह्यातील चौदा तालुक्यांतील पाण्याचे 1540 नमुने तपासण्यात आले. त्यांत 66 गावांतील 78 नमुने दूषित आढळून आले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणीनमुने तपासले जातात. ज्या गावातील पाणी दूषित आढळते, त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाणीनमुन्यांची संख्या वाढत आहे.
मार्च महिन्यात तपासण्यात आलेल्या 1540 नमुन्यांपैकी 78 नमुने दूषित आढळले. या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी 5.12वर गेली. यामध्ये तेरा तालुक्यांतील काही गावांमधील पाणीनमुने दूषित आढळले आहेत. अकोले व शेवगाव तालुक्यांतील प्रत्येकी दहा, तर पाथर्डी तालुक्यातील आठ नमुने दूषित आढळले.
दूषित पाणीपुरवठा होणारी गावे
नगर ः उक्कडगाव, कौडगाव, रांजणी, माथणी, जखणगाव, हिंगणगाव, हमीदपूर. अकोले ः पिंपळदरी, कळंब, बाडगी, पिंपळगाव खांड, शेरेवाडी, लहीत बुद्रुक, नाचणठाव. जामखेड ः रत्नापूर, लोणी, बाळगव्हाण, जातेगाव, मालेवाडी, मोहरी, नायगाव, आनंदवाडी, तरडगाव. कर्जत ः नागापूर. कोपरगाव ः धामोरी, धोंडेवाडी, घोयेगाव, उक्कडगाव, कारंजी बुद्रुक, मल्हारवाडी. पारनेर ः जवळा, सांगवी सूर्या, वडनेर, देवीभोयरे, शिरसुले. पाथर्डी ः चिचोंडी, खेर्डे, माळीबाभूळगाव, मिडसांगवी, मढी, आल्हनवाडी, ढाकणवाडी, आडगाव. शेवगाव ः माळेगाव, ढोरजळगाव, मजले शहर, शहर टाकळी, कोनोशी, एरंडगाव, सुळे पिंपळगाव, दिवटे, मुरमी, अधोडी. राहाता ः नांदुर्खी, दहिगाव, कोऱ्हाळे, वाळकी. राहुरी ः डिग्रस. संगमनेर ः अकलापूर, आभाळवाडी, येलखोपवडी, खंदरमाळ. श्रीगोंदे ः गव्हाणवाडी, डोकेवाडी, आढळगाव, मांडगव्हाण, वडघुल. श्रीरामपूर ः मातुलठाण.
नेवासे निरंक
नेवासे तालुक्यात एकूण 113 पाणीनमुने तपासण्यात आले आहेत. त्यांतील एकही नमुना दूषित आढळून आला नाही.
तालुकानिहाय तपासलेले नमुने (कंसात दूषित नमुने)
नगर ः 107 (सहा), अकोले ः 152 (दहा), जामखेड ः 69 (नऊ), कर्जत ः 47 (एक), कोपरगाव ः 117 (सहा), नेवासे ः 113 (शून्य), पारनेर ः 93 (सहा), पाथर्डी ः 148 (आठ), शेवगाव ः 201 (दहा), राहाता ः 56 (सहा), राहुरी ः 46 (दोन), संगमनेर ः 153 (आठ), श्रीगोंदे ः 149 (पाच), श्रीरामपूर ः 89 (एक).