घरकुलाबाबत माहिती देणे ग्रामसेवकाने टाळले, राज्य माहिती आयोगाकडून दहा हजाराचा दंड
पाथर्डी - तालुक्यातील अकोला ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक तिडके यांनी ग्रामस्थाला घरकुलाबाबत माहिती देणे टाळले, याबाबत धायतडकवाडी येथील ग्रामस्थ नवनाथ साबळे यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल केले होते त्यावर सुनावणी होऊन राज्य माहिती आयोगाकडून तत्कालीन अकोला ग्रामसेवकाला माहिती दडवल्याप्रकरणी दहा हजाराचा दंड केला असून सदरील दंड ग्रामसेवक तिडके यांच्या दोन समांतर पगारांमधून वसूल करण्याचे आदेश राज्य आयोगाने गटविकास अधिकारी पाथर्डी यांना दिले आहेत.
पाथर्डी तालुक्यात अनेक अधिकारी कर्मचारी राजकीय वरद हस्ताने गेली अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसले असून स्थानिक स्वराज्य संस्था पोलीस ठाणे यामधील जनहिताची माहिती दडवण्यासाठी बेकायदेशीरपणे माहिती अधिकाराची अर्ज फेटाळण्याची प्रक्रिया पार पाडतात मात्र यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी अपिल दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारले तर तालुक्यातील भ्रष्टाचाराची मक्तेदारी व बंडाळी मोडून काढण्यास मदत होईल, यासाठी प्रामाणिकपणे जनहिताची कामे करणारे सामाजिक कार्यकर्त्यांची नवीन फौज उभी राहणे आवश्यक आहे..