महाराष्ट्र
28
10
कष्टातून उभा केलेला संसार स्वावलंबन व जीवन सुंदर कसं जगावं
By Admin
कष्टातून उभा केलेला संसार स्वावलंबन व जीवन सुंदर कसं जगावं हे शिकवतो.- डॉ.तीमोथी गायकवाड
पाथर्डी- प्रतिनिधी
भारत देशात कित्येक जन विकलांग आहेत. त्यांची लग्न होत नाहीत, त्यांचा कोणी चांगला सांभाळ करत नाही. अशा मुलांना शोधनं, त्यांना बाहेर आणणं आणि समाजाशी जोडून चांगले स्थान मिळवून देण्याचे काम आमची मुंबई येथील एम केअर संस्था करते. असे विचार संस्थेचे सर्वेसर्वा डॉ .ती मोथी गायकवाड यांनी व्यक्त केले.
जवखेडे खालसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून त्यांना उभे करणे , व कायमस्वरूपी स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात गायकवाड बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा. सभापती बाळासाहेब अकोलकर हे होते. तर विचार पिठावर वृ.स. सा.कारखान्याचे मा .अध्यक्ष उद्धवजी वाघ , डॉ.उषा उबळे, रवींद्र म्हस्के,स्टेनली सर, श्रीमती स्टेनली मॅडम, विजेता केळकर, श्रीमती सोनाली गायकवाड,जवखेडे गावचे सरपंच चारूदत्त वाघ, मा. सरपंच अमोल वाघ, अॅड. वैभव आंधळे, अमोल गवळी, ह. भ.प. मतकर महाराज, जवखेडे दुमाला गावचे सोसायटी चेअरमन संदीप नेहूल, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, हनुमान टाकळी येथील सरपंच सौ.मीनाताई शिरसाठ, सदस्य बाळासाहेब बर्डे, निलेश काजळे, अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, तिसगावचे प्रसिद्ध व्यापारी सादिक पठाण, कानिफनाथ विद्यालयाचे प्राचार्य वांढेकर सर, ससाणे सर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मचे सर.आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, एम केअर संस्था ही आपत्कालीन परिस्थितीत काम करणं उचित मानते. पूर परिस्थिती संदर्भात आम्ही याला सशक्त असे नांव दिले आहे. याव्दारे आम्ही प्रोजेक्ट डिझाईन तयार केले. आणि ५३ महीलांशी संवाद साधला. त्यांच्याकडून आम्ही स्टोरी ऐकल्या आणि मुंबईत गेलो. पुन्हा दुसरी टीम आली आणि फेर सर्वे करून ५२ महिलांच्या मुलाखती घेतल्या. आणि स्वकर्तृत्वाने ज्यांना ज्यांची आवड आहे त्यानूसार त्यांना कायमस्वरूपी स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी शिलाई मशीन, बकरी पालन, तर वडापाव स्टाॅल साहित्य , बांगड्यांचा संच, झाडू , तसेच ब्युटी पार्लर प्रशिक्षण देऊन , त्यांच्या कष्टातून त्यांचं जीवन सुखी व सुंदर होऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी हा अल्पसा प्रयत्न आपत्ती ग्रस्त ५ गावातील गरजवंताला आम्ही केलेला आहे. यापुढेही मदतीचा हात सदैव तुमच्या सोबत असेल असे आश्वासनही गायकवाड यांनी दिले .यात हनुमान टाकळी गावच्या सरपंच मीनाताई शिरसाठ यांच्या विशेष प्रयत्नातून हनुमान टाकळीच्या आठ निराधार महिलांना ही मदत मिळणे साठी एम केअर संस्थेकडे पाठपुरावा केला होता.त्यात जवखेडे खा .,जवखेडे दु . करंजी, सातवड आदी गावांचा समावेश आहे.
गंभीर पूर परिस्थितीत स्वतः च्या जिवाची पर्वा न करता प्रत्यक्ष पाण्यांत उतरून पूरग्रस्तांना पुरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणारे सर्कल -कटारनवरे (तिसगाव विभाग तसेच कृषी अधिकारी लोंढे साहेब यांच्या विशेष सन्मानाबरोबर
" ज्यांच्या माध्यमातून हा एम केअर संस्थेचा प्रकल्प या पाच गावात राबवण्यात येऊन गरजवंताला आधार दिला असे करंजी गावचे सुपुत्र तथा उपसरपंच नवनाथ आरोळे यांचें प्रत्येक मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
हनुमान टाकळी येथील निराधार लाभधारक _ श्रीमती बाळूबाई दगडखैर, नंदा बर्डे, शारदा गायकवाड,उषा शिरसाठ, निकिता शिरसाठ, सविता दगडखैर, मिनाक्षी पानगे, अनिता आव्हाड इ.
विशेष टिप...
नदीने पात्रं का सोडले याचं आत्म परिक्षण प्रत्येक गावातील राजकीय नेत्यांनी करून नदी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई शासकिय माध्यमातून करून, नदी रूंदीकरण आणि खोलीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.असे दबक्या आवाजात पूरग्रस्त नागरिक बोलत होते.
या सुंदर अशा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संजय शिरसाठ सर यांनी केले.तर आभार राजेंद्र पाठक यांनी मानले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण मा. तीमोथी गायकवाड यांचा आज वाढदिवस असल्यामुळे जवखेडे ग्रामस्थांनी त्यांचा केक कापून सन्मान केला. स्नेह भोजनाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Tags :
28
10




