कवडदरा विद्यालयाची कुस्ती क्रिडा प्रकारात विद्यार्थी खेळाडूची नेञदिपक कामगिरी
कवडदरा- ग्रामीण भागात लोकप्रिय समजला जाणारा तसेच आपल्या लाल मातीतला खेळ समजला जाणारा कुस्ती खेळात
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयाच्या विद्यार्थी खेळाडूनी नेञदिपक कामगिरी तसेच प्रचंड आत्मविश्वासच्या जोरावर
नाशिक जिल्हा क्रिडा विभाग यांच्या वतीने
इगतपुरी तालुकास्तरीय कुस्ती क्रिडा प्रकारात कवडदरा विद्यालयाच्या विद्यार्थी खेळाडूचे नेञदिपक यश मिळवले
आहे.
साखळी सामना जिंकत सेमी फाइनल व फायनल जिंकून यश मिळवले आहे.एकूण सात खेळाडूची नाशिक जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
अनुक्रमे विद्यार्थी खेळाडू नावे पुढीलप्रमाणे -विनोद प्रकाश गुळवे,युवराज चंद्रभान शिंदे,करण नंदु खातळे,साहील संतोष आंबेकर,रोहीत विजय कालेकर,समर्थ प्रभाकर धुळसुंदर,प्रतिक सुरेश रनसुरे
या विद्यार्थ्यांनी तालुक्यात विविध वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे.विद्यार्थ्यांना क्रिडा मार्गदर्शक म्हणून अमोल म्हस्के यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळता आहे.
या चांगल्या कामगिरी बद्दल तसेच जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,माजी शिक्षक,सहकारी शिक्षक,माजी विद्यार्थी,मा.मुख्याध्यापक,पालक, ग्रामस्थ,माजी विद्यार्थी,सहकारी मिञ
तसेच विद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक श्री.बी.एस.पवार तसेच भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. राजेंद्रजी नलगे, सचिव मा.प्रकाशजी जाधव, मा. अध्यक्ष जे.एम.कल्हापुरे, संस्था संचालक डाॕ.प्रा.अशोकजी तुवर, तसेच सर्व संस्था संचालक पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.स्पर्धेच्या पहील्याच दिवशी विद्यार्थ्यांना यश मिळाले असून दोन दिवस चालणाऱ्या या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आणखी विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड होणार आहे.