कोरोना विरुद्ध मन खंबीर ठेऊन लढा द्या.- ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शनिवार 01 मे 2021
कोरोनाला टाळण्यासाठी आता इंदुरीकर महाराजांचे चौथे सूत्र
सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. लसीकरण आणि इतर योग्य ते नियम पाळणे हेच सध्या कोरोनावर प्रभावी उपाय ठरत आहे. यामध्ये ‘हात वारंवार धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे या त्रिसूत्रीच वापर करण्यास वारंवार सांगण्यात येत आहे.
परंतु आता समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी चौथे सूत्र सांगितले आहे. ते म्हणतात, मनाला खंबीर ठेवणे हे चौथे सूत्रही आता ककोरोना हरविण्यासाठी आवश्यक बनले आहे, भीती आणि मनाचा दुबळेपणा हा करोनापेक्षा भयंकर रोग आहे,’
असे सांगून त्यांनी लोकांना कोरोनाविरुद्ध गंभीरपणे लढा देण्याचे आवाहन केले. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प