महाराष्ट्र
35854
10
जि. प. प्राथमिक शाळेस पालकांकडून एक लक्ष रुपयांचे शैक्षणिक साहित्य
By Admin
जि. प. प्राथमिक शाळेस पालकांकडून एक लक्ष रुपयांचे शैक्षणिक साहित्य
पाथर्डी प्रतिनिधी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक कॉलनी येथे नुकताच ग्रामस्थ पालक मेळावा ग्रामपंचायत माळी बाभूळगावचे सरपंच अनिल तुजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी गटशिकाधिकारी शिवाजी कराड, श्री रामनाथ कराड, मा. सरपंच विजय बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य किशोर चव्हाण, आकाश वारे, सुनिता जाधव, ग्रामस्थ, पालक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी सरपंच अनिल तुजारे यांनी शाळेच्या गुणवत्ता विकास बाबत समाधान व्यक्त करून शाळेस निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.गटशिक्षण अधिकारी श्री शिवाजी कराड म्हणाले की, तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढत असून पालकांनी आपल्या पाल्यास जिल्हा परिषदच्या शाळेत पाठवण्याचे आवाहन केले, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड यांनी जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी गेली दोन वर्षापासून सुरू केलेल्या मिशन आपुलकी, मिशन आरंभ या उपक्रम ची माहिती देऊन शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना आवाहन केले. या वर्षी नव्याने प्रारंभ झालेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षासाठी किमान चार विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आणण्यासाठी शिक्षकांनी विशेष जादातासा सह प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मिशन आपुलकी अंतर्गत पालक ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी विजय बोरुडे,अशोक तुपे , सुनिता जाधव, आकाश वारे, किशोर चव्हाण यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.या वेळी शाळेस खलील मान्यवर ग्रामस्थ यांनी एक लक्ष रुपयांचे विविध शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण केले.ग्रामपंचायत सदस्य किशोर चव्हाण यांनी हार्मोनियम,काशिनाथ कारखेले यांनी कॉम्प्युट, टेबल व ३८स्कुल बॅगा दिल्या. अभ्यासक्रम वर्गणीहाय कॉम्प्युटर मध्ये लोड करून दिला. संगीता बुधवंत /आव्हाड यांनी साऊंड सिस्टिम,अशोक तुपे यांनी १२ स्कुल बॅगा, वही , पेन, कंपास पेटी दिल्या.ग्रामपंचायत सदस्या सुनीता मोहन जाधव व आकाश वारे यांनी दहा खुर्च्या व मॅट दिल्या. शशिकांत गायकवाड यांनी आपल्या मुलीच्या लग्नात सत्काराला फाटा देत ६० लेझीम दिले. एकूण एक लक्ष रुपयांच्या साहित्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ- पालक भाऊ पालवे, प्रमोद भावसार गुरुजी, भारत नन्नवरे गुरुजी, अशोक तुपे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास चव्हाण, संदिप खोटे, विजय बोरुडे, सोनाली बावणे, वर्षा उपाध्ये, चंद्रकात उदागे, सुरेखा शर्मा ग्रामस्थ- पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबा जायभाये, सूत्रसंचालन श्रीमती संगीता आव्हाड यांनी केले तर आभार किशोर चव्हाण यांनी मानले.
Tags :
35854
10




