इगतपूरी तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
इगतपुरी तालुका- इगतपुरी तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल इगतपूरी येथे १४/१७/१९ वर्ष वयोगटातील इगतपूरी तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धा बुधवार( दि.६) रोजी संपन्न झाल्या. सामाजिक कार्यकर्ते मा.योगेश चांदवडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्या मनोगतात शालेय जीवनात खेळाचे महत्त्व सांगून सर्व क्रीडा स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.इगतपूरी तालुका क्रीडा प्रमुख मा.तेलोरे सर यांनी सर्व क्रीडा स्पर्धकांना स्पर्धेविषयी माहिती सांगून.शिस्तीचे पालन करावे असे आवाहन केले.सुत्र संचलन मा.इ.ता.क्रीडा प्रमुख मा.सोनवणे सर यांनी केले.श्री.राजकुमार शर्मा सर, श्री.गोडसे सर, श्री.राहुल पंडित सर , श्री.लगड सर, श्री.चव्हाण सर,श्रीम.देवरे मॅडम, श्रीम.परेरा मॅडम, श्री.म्हसणे सर, श्री.तोफिक सर, श्री.सुनिल सर, उपस्थित होते.
शालेय फुटबॉल स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
14 वर्षातील मुली
प्रथम -लिटिल ब्लॉसम स्कूल इगतपूरी
द्वितीय -प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूल कवडदरा
14 वर्षातील मुले
प्रथम -लिटिल ब्लॉसम स्कूल इगतपूरी
द्वितीय -म.गांधी हायस्कूल इगतपुरी
17 वर्षातील मुली
प्रथम -लिटिल ब्लॉसम स्कूल इगतपूरी
द्वितीय -प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूल कवडदरा
17 वर्षातील मुले
प्रथम -लिटिल ब्लॉसम स्कूल इगतपूरी
द्वितीय -प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूल कवडदरा
स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री.राजकुमार शर्मा, श्री.शुभंम दुबे, श्री.पगारे, श्री.मोन्या पगारे , श्री.सनी पगारे यांनी काम पाहिले.ग्रांऊड मार्किंग श्री.रवी गिरी
सर्व विजेते संघांचे व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.